परवाच एका डेंटिस्ट कडे जाण्याचा योग आला .. बरेच जुने डेंटिस्ट असल्या मूळे नुकतेच त्यांनी कालानुरूप संपूर्ण क्लिनिक चे रिनोवेशन केले होते , डिझायनर ने त्याच्या अनुभव व क्षमते प्रमाणे क्लिनिक चे इंटिरियर केले होते संपूर्ण इंटिरियर हे भडक व मनाला एक प्रकारचे ताण देणारे होते. जागा पाहताना मनात एकच विचार यायला लागला कि घर आणि क्लिनिक या मध्ये काहीच फरक नसतो का? तेव्हा उत्तर मिळाले कि घराचे इंटिरियर करताना मुख्यतः तेथे राहणाऱ्या लोकांचा विचार करावा लागतो त्यांच्या सवयी आवडी निवडी या गोष्टी त्या मध्ये अंतर्भूत असतात व क्लिनिक ला हे नियम लागू होत नाहीत.
क्लिनिक डिझाईन करताना नेमके उलटे धोरण अवलंबावे लागते , क्लिनिक मध्ये येणारा रुग्ण हा कोणत्या न कोणत्या व्याधी ने त्रासलेला असतो व त्याचा बराचसा वेळ म्हणजे साधारण अर्धा तास इतका वेळ हा वेटिंग एरिया मध्ये खर्च होतो , अश्या वेळी तो मासिके (आठ दहा महिने जुनी) चाळून झाली कि तो निव्वळ आजुबाजू च्या गोष्टींचे निरीक्षण करायला लागतो . या गोष्टींचा विचार करता वेटिंग एरिया मध्ये वातावरण जास्तीत जास्त प्रसन्न कसे करता येईल व त्या अनुषंगाने आपले डिझाईन डोळ्यांना व मनाला एक आल्हाददायी भावना कशी देता येईल जेणे करून त्या रुग्णाला त्याच्या दुखण्या विषयी थोडा वेळ विसर पडेल या गोष्टीचा विचार डिझायनर ने करावयास हवा.
क्लिनिक चे डिझाईन करताना इंटिरियर डिझायनर ने भडक वॉलपेपर व भडक टेक्शचर्स कलर्स यांचा वापर टाळायला हवा , ले – आउट जितका सुटसुटीत ठेवता येईल तेवढा प्रयत्न करावा भिंतीना लाईट टोन मधले कलर द्यावेत फर्निचर ची रचना व त्याचे फोर्मायाका देखील भिंतींना अनुसरून प्रमाणबद्ध असावे जेणे करून पेशंट ला तो वाट पहायचा काळ तणावयुक्त वाटू नये. आपल्या कामा मध्ये एक साचे बद्धता नसावी , हॉटेल घर व क्लिनिक हे तीन वेगवेगळे वास्तू प्रकार आहेत व त्यांचे डिझाईन देखील वेगवेगळेच असायला हवे कोणतीही वास्तू डिझाईन करताना साध्या व सोप्प्या गोष्टी चा विचार केला तर होणार्या वास्तू चे इंटिरियर हे आपल्या व त्या वस्तूचा काही काळ का होईना अनुभव घेणाऱ्या व्यक्तीन साठी नक्कीच आनंददायी ठरेल हे तितकेच महत्वाचे.
Leave a Comment