सर्वसामान्य लोकांना हल्ली भेडसावणारा प्रश्न म्हणजे गावात जागेचा . कुटुंबा मध्ये वाढलेली सदस्यांची संख्या व जुन्या घराची झालेली जीर्ण अवस्था या मुळे नवीन घर घेण्याची निकड सर्वसामान्य लोकांना कायम जाणवते पण आवाक्या बाहेर गेलेले जागेचे दर व मुख्य शहरात तुलनेने कमी असणारे बांधकाम प्रकल्प अश्या कारणांमुळे मुळे नवीन घर घेणे हे काही स्वप्नपूर्ती पेक्षा कमी होत नाही . त्यातच जुन्या राहत्या सोसायटी मधले काही अंतर्गत वाद विवाद व त्यामुळे सोसायटीचा रखडलेला पुनर्विकास तसेच जुन्या जागे मधील निर्माण झालेले भावनिक नाते या मुळे लोकांचीस्थिती इकडे आड तिकडे विहीर अशी होते .
दरम्यानच्या काळात घरा मधील सध्याच्या TECH SAVY पिढीला जुन्या घरा मधील सोयीसुविधा नकोश्या वाटतात हे अनुभव बहुतेक सगळी कडे पहायला मिळतात . याची कारणे साधारण नवीन पिढीचा बाहेरच्या जगात वाढलेला वावर व सोशल सर्कल मध्ये पाहण्यात आलेल्या इतरांच्या घरा मधील लेटेस्ट एमेनिटीज इत्यादी होत . दुसरीसमस्या म्हणजे घरातील वृध्द सदस्यांना मुळातच गुडघ्याच्या त्रासा मुळे इंडियन भांडे हे गैरसोयीचे ठरते आणि एकदा इमारत जुनी झाली कि खालच्या निवसिके मध्ये आपल्या WC व बाथरुमचे लिकेज सुरु होते . या कारणां मुळे प्रसंगी सोसायटी मधील सदस्यां बरोबर वादाचे प्रसंगही ओढावतात . यांना पर्याय उरतात ते म्हणजे WC व बाथरूम चे water प्रूफिंग करून घेणे व नवीन कमोड बसवणे ज्याने वृद्धमंडळींना गुढग्याचा त्रास कमी होइल.
दरम्यानच्या काळात घरा मधील वस्तूंचे आयुष्यमान काळानुरुपाने संपत आलेले असते उदा.जुने वायरिंग, लोखंडी खिडक्या , बेसिन ,जुने फर्निचर , WC बाथरूम मधील टाइल्स ईत्यादी. व कुठेतरी मनाला एक बदल खुणावत असतो. अश्याच येणाऱ्या निरनिराळ्या समस्यां मुळे घराच्या रिनोवेशन चा निर्णय चर्चे अंती ठरतो .
एकदा का रेनोवेशन करण्याचा निर्णय पक्का झाला कि लोकांना मुख्यतःपडणारे प्रश्न म्हणजे .
1. रिनोवेशन साठी येणारा खर्च कितीअसेल ?
2. मना मध्ये ठरवलेली एखादी Theme आपल्या बजेट मध्ये बसेल का आणि ती प्रत्यक्षात कशी दिसेल ?
3. बहुतेक ठिकाणी पती पत्नी जॉब करणारे असल्याने कामा कडे लक्ष कोण देणार ?
4 . आपण ठरवलेल्या बजेट मध्येआपल्याला अपेक्षित तो वॉव लूक घराला मिळेल का?
5. घराची तोड़फोड़ करताना इमारतीची काही नुकसान होईल का ? इत्यादी
या पुढचा टप्पा म्हणजे होणाऱ्या कामाचे कोटेशन मित्र व नातेवाईक यांच्या ओळखी मधील दोनतीन ठेकेदारा कडून घेणे , पण खरी गोंधळाची परिस्थिती याच स्टेज मध्ये होते कारण एकाच कामाचे येणारे वेगवेगळ्या किमतींचे कोटेशन्स गोंधळात आणखीनच भर टाकतात .
उ. दा समजा रमेश ने त्याच्या घराच्या संपूर्ण रिनोवेशन चे कोटेशन मागवण्या चे ठरवले , मात्र एकाच प्रकारच्या कामासाठी येणाऱ्या कोटेशनची किंमत हि वेगवेगळी आहे . अ.ठेकेदाराने ८ लाखाचे कोटेशन दिले आहे, ब ठेकेदाराने ९ लाखाचे तर क. ठेकेदाराने ने ६ लाखाचे . त्यामुळे साहजिकच पडणारे प्रश्न असे कि. . क ठेकेदाराचे कोटेशन पास करणे म्हणजे काम पूर्ण होईल कि नाही याची चिंता मनास कुठे तरी रमेश ला भेडसावत राहील कारण होणाऱ्या कामाच्या किमतीचे अचूक आकडा काढणे हे त्या व्यक्तीचा अनुभव व त्या क्षेत्रा मधील नैपुण्य या मधूनच शक्य होते . एस्टीमेट काढताना थोडीसुद्धा चूक आर्थिकद्रुष्ट्या आपल्याला अडचणीत आणणारी ठरते . वर्क फ्लो चे चुकलेले नियोजन किंवा मटेरिअल च्या किमतीमध्ये आलेले चढ उतार या मुळे कित्येक ठिकाणी काम अर्धवट सोडून गेलेल्या केसेस हि पाहायला मिळतात , अश्यावेळी ठेकेदाराने फोन न उचलणे ,फोन बंद करून ठेवणे अश्या गोष्टींचा अनुभवही लोकांना मिळतो ,अश्या स्थिती मध्ये नोकरी च्या ठिकाणी रजा टाकून राहिलेले अर्धवट काम पूर्ण करून घेणे हे मनस्ताप देणारे ठरते. येणाऱ्या कोटेशन च्या वेगवेगळ्या किमती मनात नक्कीच गोंधळ करतात व दुसरा ९लाख चा आकडा त्या ठिकाणी बराचजास्त वाटतो .
घराचे नुतनीकरण करताना मुळातच गुणवत्ते मध्ये मुळीच तडजोड न करता येणाऱ्या खर्चाचे नियोजन पद्धतशीरपणे आराखडे काढून काढणे गरजेचे असते.
आपले घर कमीत कमी खर्चा मध्ये सुंदर व आकर्षक तयार व्हावे हि प्रत्येक व्यक्तीची अपेक्षा असते मिळणाऱ्या जागेचा जास्तीत जास्त वापर करताना मात्र आपण आपल्या इमारतीच्या स्ट्रक्चर शी कोणत्याही प्रकारची छेडछाड तर करत नाही ना हे सुद्धा पाहणे महत्वाचे ठरते. रिनोवेशन सेगमेंट हे मुळातच अनऑर्गनाईज सेक्टर आहे त्यामुळे या क्षेत्रा मध्ये योग्यतो अनुभव व इमारतीच्या स्ट्रक्चर ची जाण असणे सर्वात महत्वाचे असते , बेफिकिरीचे किंवा अज्ञानाचे कामातील धोरण येणाऱ्या अपघातांना आमंत्रण देणारे ठरते . जसे कि बंगल्या मध्ये किंवा वर खालील मजल्या वर असलेल्या फ्लॅट मध्ये स्लैब फोडून जिना तयार करणे ,अंतर्गत सजावटी साठी अडथळा ठरणारे कॉलम तोडणे , बीम पंक्चर करणे , नवीन तयार होणाऱ्या भिंतीची रचना खालील मजल्यावर अधिक ताण येईल अशी करणे , अश्या गोष्टी करून आपण नकळत स्वतः चा व इमारती मधील दुसऱ्या लोकांचा जीव धोक्यात घालत असतो.अधुन मधून वर्तमानपत्रा मध्ये येणाऱ्या अपघाताच्या बातम्या या अश्याच गोष्टींचा परिणाम असतो.
आपल्या आयुष्या मध्ये पोटाला चिमटा काढून आयुष्यभर हफ्ते भरून उभ्या केलेल्या वास्तूस नुतनीकरण करताना सुरक्षित हातात देणे गरजेचे असते. उत्तम मनासारखे वास्तूचे नुतनीकरण होणे म्हणजे संपूर्ण कुटुंबाला एक नाविन्यपूर्ण वास्तूची उर्जा देणारे ठरते.
रिनोवेशन नंतर घरा मध्ये झालेला आमुलाग्र बदल , वाढलेला प्रकाश , अचूक जाणीव पूर्वक सुधारलेला लेआऊट मनास आनंद देऊन जातात कारण आता तिथे कडप्याच्या ओट्या ची जागा ग्रेनाइट बरोबरच मोड्युलर किचनने घेतलेली असते जुने अंधारलेले न्हाणीघर आता नवीन आकर्षक डीजीटल टाईल्स व लेटेस्ट बाथ फिटिगज मुळे जास्त आकर्षक व प्रशस्त झालेले असते. नुतनीकरण हि काळाची गरज आहे मात्र ते करताना सर्व गोष्टींचे नियोजन करणे हे तितकेच महत्वाचे.
Leave a Comment