पूर्वी असे दिवस होते कि घराच्या बांधकामाचा किंवा इंटिरियर चा विषय निघाला कि त्या संदर्भातील सर्व निर्णय एकाधिकार शाहीने घरातील पुरुष मंडळी घेत असत व महिला वर्गाने काही कल्पना किंवा सल्ले मांडले कि ” तुला काय कळतंय ?” या शेर्याने त्या सल्ल्या ला केराची टोपली दाखवण्यात येत असे. परंतु काळ बदलला व महिलांचा निर्णय प्रक्रियेतील सहभाग पण वाढला .हल्लीची स्त्री स्मार्ट आहे , ती घर , ऑफिस व सोशल लाईफ या सर्व फ्रंटस वर उत्तम बॅलेन्स ठेवते ,
एखाद्या घराच्या इंटिरियर बाबत आम्ही जेव्हा प्रार्थमिक चर्चे साठी क्लायंटना भेटतो तेव्हा संपूर्ण फमिली चर्चे दरम्यान इनवोल्व असते काही काही वेळा तर महिला वर्ग पूर्ण तयारीनिशी चर्चे मध्ये सहभाग घेतो जसे कि , आज्जीनी देवघर कुठे तरी पाहिलेले असते व त्यांना अगदी तसेच देवघर पाहिजे असते ” हे माझ्या पसंतीने करा बाकी तुमचं तुम्ही काहीही ठरवा” असा आज्जी आजोबांचा सूर असतो.
हि थीम मी पहिली आहे अमुक अमुक ठिकाणी असे फॉल्स सिलिंग होते , यु शेप किचेन ओटा करता येईल का? अश्या अपेक्षा महिलांच्या असतात .
महिलांच्या अपेक्षा डिझाईन बद्दल अश्या असतात कि तिच्या वेळेचा योग्य वापर होईल ,” योग्य गोष्ट योग्य जागी ” हे तत्व अश्या वेळेस लागू पडते . स्मार्ट किचन्स हि आजच्या स्त्री ची गरज आहे किचन डिझायन करताना ती कमालीची दक्ष असते मायक्रोव्हेव कुठे येणार ? चिमणी कोणती? फ्रीज सिंक बद्दल तिच्या प्रार्थमिक अपेक्षा असतात , ती किचन स्टोरेज बद्दल कमालीची आग्रही असते. हे सल्ले आम्हाला त्या फमिली चे लायकिंग व कॅरेक्टर ठरवण्यात मदत करतात व बहुतांश वेळा जेव्हा त्यांच्या घराचे इंटीरियर फायनल होते तेव्हा त्यांच्या चेहेर्या वरचे समाधान आपल्या कामाची पावती देऊन जाते.
इंटीरियर डिझायनर या क्षेत्रा मधील अभ्यास व अनुभवाने उपलब्ध जागेचा सुबक व योग्य वापर करून घेतो व त्या घर मधील लोकांच्या गरज व अपेक्षा पूर्ण करण्यात मदत करतो . घर डिझायन करताना घरात राहणाऱ्या प्रत्येक सदस्याची त्यांच्या सवयींची त्यांच्या व्यक्तिमत्वाची सांगड घालणे महत्वाचे असते.
आपण इंटीरियर डिझायनर च्या माध्यमातून आपल्या सभोवतालच्या वातावरणात एक वेगळा दृष्टीकोन आणत असतो , त्या जागे मध्ये रंग , वेगवेगळी मटेरिअल्स, पोत , आकार यांच्या मदतीने एक प्रकारची संवेदना निर्माण करत असतो. आपण आपल्या कल्पने नुसार व गरजे नुसार एक फंक्शनल स्पेस निर्माण करत असतो , म्हणूनच घर डिझायन करण्याच्या प्रोसेस मध्ये प्रत्येक व्यक्तीच्या मताचा विचार होणे गरजेचे आहे. तुम्ही पहिले असेल चिमण्या व पाखरे घरटे बांधताना एकत्र बांधतात , असे डिझायन व सजवलेले घर मनाला एक प्रकारची वेगळीच अनुभूती व उर्मी देऊन जाते हे तितकेच महत्वाचे.
©Excel Constructions & Interior Designers.
Leave a Comment