जुन्या घराच्या रिमोडेलिंग किंवा इंटीरियर डिझायनिंग साठी जेव्हा क्लायंट संपर्क करतात तेव्हा पहिल्या औपचारिक मिटिंग मध्ये बऱ्याच मजेशीर गोष्टी घडतात.सहसा मिटिंग मध्ये चर्चा करताना असे जाणवते कि घरा मधल्या प्रत्येक सदस्याचे रिनोवेशन बद्दल स्वतः चे असे कल्पनांचे प्लॅन्स आहेत प्रत्येकाने होणाऱ्या नवीन घरात कोणत्या गोष्टी करायच्या याचा मनात किंवा कधी कधी पेपर ( सध्याच्या भाषेत नोटस मध्ये) मध्ये लेखा जोखा मांडलेला असतो, ज्या मध्ये तरुण पिढीचा फोकस हा घरा मधले सर्व जुने सामान काढून संपूर्णतः नवीन करण्यावर असतो. खाजगी मध्ये बोलताना हि पिढी सांगते कि
” सगळं काढून टाका , आता सगळं नवीन केल्यावर पुन्हा जुनं सामान घरात ठेऊन घराचा लुक डिस्टर्ब कशाला करायचा ? एवढा खर्च करून जूनच सामान घरात ठेवायच असेल तर आहे ते घर चांगल आहे.”
तिथेच घरा मधील जुन्या पिढीचं मत हे त्या जुन्या वस्तू फेकू नयेत असे असते. अश्या प्रसंगान मध्ये अनुभव विरुद्ध उत्साह या मधला सुवर्णमध्य काढणे महत्वाचे असते कारण बऱ्याच वेळा इंटीरियर डिझायनिंग चा मूळ हेतू बाजूला पडून घरात ताण तणावाचे प्रसंग बघायला मिळतात .
जुन्या पिढीच्या दृष्टिकोनातून विचार केला असता असे जाणवते कि त्या पिढीमध्ये बऱ्याच जणांना आर्थिक सुबत्ता हि वयाच्या उत्तरार्धात आलेली असते, बऱ्याच कुटुंबांच्या संसाराचा प्रवास हा वाड्याच्या एका खोली मधून सुरु होऊन नंतर अपार्टमेंट पर्यंत आलेला असतो , त्या मुळे त्या सुरुवातीच्या काळात पोटाला चिमटा काढून घेतलेल्या वस्तूं मध्ये त्यांच्या भावना गुंतलेल्या असतात .
रिमोडेलिंग करताना आपण घराचा आराखडा जेव्हा तयार करतो त्या वेळी घरा मधल्या कोणत्या गोष्टी आपण नव्या रुपात रिनोवेट केलेल्या घरा मध्ये सामावून घेऊ शकतो अश्या वस्तू आपण शोर्ट लिस्ट केल्या पाहिजेत व ज्या वस्तू अगदी वापरा पलीकडे गेल्या आहेत त्या वस्तूंची योग्य विल्हेवाट योग्य ठिकाणी लावली पाहिजे , जसे कि घरा मधले जुने फर्निचर जुने फर्निचर विकत घेणाऱ्या योग्य एजन्सी ला विकणे महत्वाचे आहे नाही तर सागवान लाकडाचे फर्निचर कवडीमोल भावात विकून फसवणूक झालेली उदाहरणं पण पाहायला मिळतात.
एखाद्या वास्तूचे नुतनीकरण करताना आपण जुन्या वस्तूंना पुन्हा नवीन लुक अथवा फिनिशिंग देऊन नुतनीकरण वर होणारा खर्च आपण बऱ्याच अंशी नक्कीच कमी करू शकतो,
जसे कि
1) जुन्या ३ सीटर सोफ्याला आपण त्याचे फॅब्रिक व कुशानिंग चेंज करून अथवा लाकडी सोफ्याला PU कोटिंग करून नवीन रिच लुक देऊ शकतो,
2) जुन्या वोड्रोब ला जुने सनमायका काढून नवे टेक्शचर्ड डिझायनर लॅमिनेट देखील लावू शकतो.
3) जुन्या MS खिडक्या काढून जर स्लायडिंग विन्डो बसवणार असू तर जुन्या खिडक्या भंगारात न देता त्यांचा उपयोग MS सेफ्टी ग्रील म्हणून करू शकतो.
4) मेटल चे जुने कपाट असेल तर त्यास आपण वुडन शटर्स लावून आपल्या इंटिरियर च्या थीम शी मॅच करू शकतो,
5) जुने दार टाकून न देता त्याला आपण विविध फिनिशिंग मध्ये अपेक्षित असा लुक देऊ शकतो.
योग्य विचारपूर्वक केलेल्या कृतीने आपण रिनोवेशन चे बजेट बऱ्याच अंशी कमी करतोच मात्र जुन्या आठवणी मधल्या वस्तूंना नवीन स्वरुपात जतन केल्याचे समाधान देखील आपल्या मनाला मिळते हे तितकेच खरे .
Leave a Comment